श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र एक अभ्यास भाग १ (E Book 1)
१४ व्या शतकात श्री दत्तात्रेयांचे प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ होऊन गेले. श्री. शंकर भट्ट या उडुपी स्थित ब्राह्मणाने त्या काळात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र कशाप्रकारे लिहिले, त्यांना मिळालेली दैवी आज्ञा, ईश्वरनियोजित प्रवासात त्यांना मिळालेल्या विविध साक्षी, श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याशी आलेला संबंध या सूत्रांवर ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र : एक अभ्यास ’ हा ग्रंथ आधारित आहे. या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या समकालीन सामाजिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थितीचा ऊहापोहही करण्यात आला आहे. हवाईदलातील निवृत्त अधिकारी आणि लेखक श्री. शशिकांत ओक यांनी या ग्रंथाचे संकलन केले आहे. हा ग्रंथ सनातन प्रभात वाचकांसाठी तयार केला होता. येथे लेख रूपाने साभार प्रकाशित करत आहोत.
हवाईदलातील सन १९८१ ते १९८६ कालातील माझ्या सेवेत नवी दिल्लीमधील वेस्टर्न एयर कमांड मुख्यालयात पोस्टींगमधे असताना विवाहितांना सिव्हिलियन भागात घर करून राहायला परवानगी असे. मला जनकपुरीत घर मिळाले. तिथे सी २-२२७ बंगल्यात राहात असताना १९८५ साली ‘जर प्रचिती येईल तर वाचन करेन’ असे थोडेसे आव्हानात्मक बोलून मी वाचायला सुरवात केली. आणि खरोखरच तशी प्रचिती वाचनाच्या तिसऱ्या दिवशी पासून मिळत राहिली. त्या मधून ‘अंधार छाया’ नावाने मराठी कादंबरीचे लेखन आपोआप चालू झाले. एकदा कोर्ट कचेरीच्या दुष्ट किटाळातून ‘बाइज्जत’ सुटका झाली. नंतरच्या काळात नाडी ग्रंथभविष्य या त्यावेळपर्यंत भारतीयांना काहीशा अज्ञात विषयातून अनेकांना मार्गदर्शक होईल असे समाजकार्य घडले.
हे पुस्तक किंवा ईबुक पारायण करताना किंवा आधी किंवा नंतर, ‘स्थाली पुलक’ न्यायाने म्हणजे संपूर्ण जेवण लहानशा ताटलीत देतात तसे, त्या त्या दिवसाच्या अध्यायात काय म्हटले आहे? काही संकल्पना, गावे, मंदिरे, ऐतिहासिक व्यक्ती, अन्य माहिती फोटो यावरून सातशे वर्षांपूर्वीच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि सामाजिक रचनेची थोडक्यात कल्पना यावी असा विचार करून सादर केले आहे. यामध्ये आणखी भर घालून वाचकांची सोय करावी ही विनंती.
In the 14th century, the first incarnation of Shri Dattatreya became Shripad Shrivallabh. Mister. Shankar Bhatt or a Brahmin based in Udupi wrote about the character of Shripad Shrivallabh at that time, the divine orders received by him, the various witnesses he got during his God-planned migration, the entire relationship or sutras with Shripad Shrivallabh, this book ‘Shripad Shrivallabh Charitra: Ek Abhyasm’ is based on. In this book, the contemporary social, historical and geographical situation of Shripad Shrivallabh has been discussed. Retired Air Force officer and author Shri. Shashikant Oak is a compilation of books. Yes, we are publishing this article here for the readers with great gratitude.



















Alka Oak –
मनोगत भाग १
पोथी वाङ्यमयाचे रसभरित माहितीपूर्ण कथन. दत्त संप्रदायातील श्रद्धावंतांसाठी उपयोगी ई बुक मालिका…