भाग २ सिद्दी मसूदचा पेच
शिवाजी या नदीच्या पात्रात कुठे लपलेला आहे किंवा तो विशाळगडाला आधीच सटकला आहे?

गोळ्यांच्या घावाने जखमी होत एक एक करून बाजींच्या तलवारबाजांचे धैर्य कमी कमी होत होते. स्वतः जखमी असून देखील पुन्हा पुन्हा आवेशाने उठून समोरच्याला वारांने मारत सुटत होते. बाजींना तोफांच्या आवाजांची आतुरता होती.
महाराजांना सुखरूप विशाळगडावर जाण्यात या खटाटोपाला सार्थकता होती. घळीच्यावरून पठाणांच्या तलवारबाज तुकड्यांनी घळीच्यावरून येऊन एकदम चढाई करायची चाल रचली गेली.
बाजीं सभोवती रिंगण करून आता अनेक तोडीचे तलवारबाज समोरासमोर ठाकले. दोन्ही हाताने सळसळणाऱ्या पात्यांचे वलय समोरच्यांची मुंडकी उडवत होते. क्षणांत कोणाची हातासकट तलवार गळून पडत होती. हा एक वीर आटपत नाही असे पाहून दुरून नेम धरून बंदूकबाजांनी नेम घरला पण क्षणाक्षणाला बदलत्या हालचालींमुळे त्यांचे नेम चुकत होते.
बंदुकीच्या बारांच्या आवाजाचा कोलाहल आसमंतात माजला असताना विशाळगडाकडून तोफेच्या बाराकडे बाजींचे लक्ष होते. उरलेल्या सैनिकांना म्हणत होते, हर हर महादेव…गड्यांनो कळा सोसा… महाराजांना सुखरूप गडावर पोचवल्याशिवाय आता विश्राम नाही… …

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.