
सन १३०० ते १५०० पर्यंत भारतातील राजसत्तेच्याबाजूने काय काय परिस्थिती असावी याचा आढावा घ्यायचा प्रयत्न. अल्लाउद्दिन खिलजीच्या तर्फे मलिक काफूरने सन १३१२ मधे मदुरा काबीज केली. महंमद बिन तुगलघ याच्या काळात १३२० ते १३५१ मदुरै पर्यंतचा भूभाग तुर्की सुलतानांच्याकडे आला होता १३५० मधे भीषण आग लागून मीनाक्षी मंदिर आणि शहराचे नुकसान झाले असावे. त्याआधीचे संपन्न व भरभराटीस आलेले मंदिर व आसपासचा गजबजलेला शहराचा भाग १३४० सुमारास शंकर भट्टांनी तेही अनुभले. (अ २.६ काळमागे करून असे दोन प्रकारचे अनुभव प्रसादरूपाने देण्याची श्रीपादांची आज्ञा होती.)
विजयानगर राज्य १३३६ त स्थापन झालें. सुमारें अडीचशें वर्षेपर्यंत मुसलमान लोक यावर स्वाऱ्या करीत होते, परंतु बराच कालपर्यंत यानें त्यांना दाद दिली नाहीं. विजयानगरचें राज्य कृष्णा नदी ओलांडून दक्षिण हिंदुस्थानभर होतें असें म्हणतां येईल. आज विजयानगर राजघराण्यांतील वंशज अनागोंदीस राहतात. त्यांनां थोडी फार जमीन असून इंग्रज सरकार कांहीं पेन्शन देतें. राजवाडा व त्याच्या भोंवतालचें आंगण हा या शहरचा मुख्य भाग गणला जातो. राजवाडयाच्या जवळ परंतु तुंगभद्रेच्या कांठीं नरसिंहाची पाषाणाची मूर्ति खोदलेली असून तिची उंची २२ फूट आहे. नदीच्या कांठीं पंपावतीचें दुसरें एक देऊळ आहे. हीं कामें बहुतेक कृष्णदेवरायाच्या अंमलांत झालेलीं आहेत. रामायणांत जी किष्किंधा नगरी वर्णिलेली आहे ती हंपीजवळच असावी. तेव्हां या स्थानाला क्षेत्राचेंहि महत्व प्राप्त झालें आहे. हरिहर (१३३६-१३५६)आणि बुक्कराय (१३५६-१३७७) यांनी विजयानगरमची स्थापना केली. त्यांना प्रेरणा होती स्वामी विद्यारण्यांची. उन्मनी अवस्थेतील एका अवधूतांनी पीठापुरच्या जवळच्या एला नदीतून (सध्याचे नाव अर्ला) स्वयंभू दत्तमुर्ती शोधून अप्पळराज आणि सुमती यांच्या हस्ते पुन्हा स्थापित करायला लावली. ते अवधूत नंतर माधवाचार्य किंवा विद्यारण्य स्वामी झाले.

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.