
आत्मा व पुनर्जन्म नाकारणाऱ्या, ते खोटे म्हणणाच्या जडवादी डार्विनवाद्यांना वरील अत्यंत महत्वाचे आध्यात्मिक जीवशास्त्रीय तथ्य माहीत होत नाही व परिणामी आंधळ्या जनुकामुळेच त्यांच्यातील योगायोगाने घडणाऱ्या उत्परिवर्तनामुळेच (chance mutations) जीवाची उत्क्रांती घडते असे ते (चुकीचे) समजतात, नव्हे अट्टहासाने प्रतिपादितात. (पाहा रिचर्ड डॉकिन्सच्या Selfish Gene) अशा रीतीने जनुकांचे गुणधर्म आत्मा ठरवत असल्यामुळे जनुकांच्या माध्यमातून, त्यांच्यातील उत्परिवर्तनातून आत्माच नवीन जीवजाती निर्माण करतो व उत्क्रांती घडवून आणतो. पुनर्जन्म व त्याच्या अनुषंगाने घडणाऱ्या सर्व जीवशास्त्रीय घटनाही आत्म्यामुळे अर्थात जीवस्थित परमात्म्यामुळेच घडून येतात. या घटना कशा घडतात हे कळण्यासाठी पुनर्जन्मातील लिंगनिर्धारणाचे उदाहरण घेऊ. स्त्री व पुरुष बीजातील X X ही गुणसूत्रे (chromosomes) एकत्र आली तर स्त्रीलिंग ठरते व X Y गुणसूत्रे एकत्र आली तर पुल्लिंग ठरते. पण ही गुणसूत्रे वाहून नेणारी स्त्री व पुरुष बीजे (gamets) जडवादी डर्विनवादी समजतात त्याप्रमाणे योगायोगाने (अपघाताने) एकत्र येऊन गर्भधारणा करीत नाहीत. पुनर्जन्म घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचा आत्मा (आत्मास्थित परमात्मा) गर्भधारणेसाठी त्यांना एकत्र आणतो.
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.