
पुढील जन्म कुठे घ्यायचा हे कोण ठरवते ?
एखाद्या व्यक्तीला कुठे जन्म घ्याव्याचे हे ठरविण्याचे स्वातंत्र्य असल्याचे दर्शविणारी अशी प्रकरणे तुरळक आढळून येतात. बहुसंख्य प्रकरणात पुढील जन्म कुठे घ्यावयाचे हे ठरविण्याचे स्वातंत्र्य नसल्याचे दिसते. हे स्वातंत्र्य अर्थात् कर्माध्यक्ष ईश्वराचे आहे. जेथे हे स्वातंत्र्य एखाद्या व्यक्तीला असल्याचे दिसते ते सुध्दा तिच्यातील ईश्वराचेच ते स्वातंत्र्य असून ते अतींद्रिय शक्तीच्या स्वरूपात प्रकट झालेले असते, इतकेच. प्रत्येक व्यक्तीत अतीद्रिय (ईश्वरीय) शक्ती सुप्त स्वरुपात अस्तित्वात असते. काही व्यक्तीत ती प्रसंगोपात्त प्रकट होते, इतकेच. वरील व्यक्तीत ती प्रसंगोपात्त प्रकट झालेली दिसते आहे. (Reincarnation and Biology-Ian Stevenson)
१. ब्रह्मदेशातील मा खिन् सान तिन् व मां खिन् सान यिन्
या जुळ्या मुलींचे प्रकरण
मा खिन् सान तिन् व मा खिन् सान यिन् या जुळ्या मुली १७ नोव्हेंबर १९४९ रोजी उत्तर ब्रहादेशातील प्यावब्वे या शहरापासून ३ कि.मी. अंतरावर अंतरावर असलेल्या मिन्लान या खेड्यात जन्मल्या. त्यांच्या वडिलाचे नाव उ चित् ह्त्वे व आईचे नाव दाव खिन् क्यी. उ चिन् ह्त्वे हा व्यवसायाने लोहार होता. या जुळ्या मुलीना ७ भावंडे होती. पांच त्यांच्याहून मोठी व दोन लहान. मा खिन् सान तिन् ही मा खिन् सान यिन पेक्षा पाच मिनिटांनी मोठी होती. हे जुळे दोन भिन्न बीजापासून जन्मल्याचा तर्क करण्यात आला आहे. तीन वर्षांनी त्या बोलायला शिकल्या. १३ वर्षांच्या झाल्यावर त्यांनी शेजारच्या घरातील दाव सान मै ह्या बाईला सांगितले की त्या मागच्या जन्मी दोघे जपानी सैन्यातील भाऊ होते व ज्या घरात त्यांनी जन्म घेतला त्या घराच्या पश्चिमे कडील जागेत मेले होते. ही गोष्ट आपल्या कुटुंबातील कुणालाही त्यांनी सांगितली नव्हती. मात्र आपल्याला जपानला घेऊन जाण्यास आपल्या कुटुंबियांना त्या सांगत असत. त्या शेजारच्या बाईकडूनच त्यांना त्यांच्या मागच्या जन्मात जपानी भाऊ असल्याचे समजले, मात्र तेरा वर्षापर्यंत त्या दोघी आपसांत कोणालाही न समजणाऱ्या भाषेत बोलत असत. ही जपानी भाषा असावी असा यांच्या कुटुंबियांनी साहजिकच तर्क केला, पण त्याची त्यांनी पडताळणी केलेली नाही.
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.