

उत्तरा बाळाजी हुद्दार ( जन्म १९४१, शिक्षण एम. ए.) तिचे व्यक्तिमत्व वयाच्या ३३व्या वर्षापासून अधून मधून लोप पावू लागले व वैद्य विश्वनाथ मुखोपाध्याय यांची पत्नी असल्याचे सांगणाऱ्या एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या स्त्रीचे व्यक्तिमत्व तिच्या (उत्तरेच्या) शरीराचा ताबा घेऊ लागले. म्हणजे आपण शारदा असल्याचे ती सांगू लागली.
विजेचे दिवे, रेडिओ, पंखे, गॅस स्टोव्ह, मोटारी यांची तिला ओळखत नसल्यामुळे त्याकडे ती भितीयुक्त कुतूहलाने पाही. टेप रेकॉर्डरला ती डाकन (स्त्री पिशाच) म्हणे. उत्तरेच्या घरातील लोकांना ती परके समजे. तिला स्नानगृह, संडास दाखवावा लागे. अंतर्वस्त्र न वापरता केवळ (बंगाली पद्धतीने) साडी नेसे. मासिक पाळीच्या वेळी केळीचे पान व कापूस मागून वापरे. देवपूजा करताना रांगोळीने वाघावर बसलेल्या दुर्गादेवीची व नागाच्या फण्या खालील शिवलिंगाची आकृती काढी. व बंगाली स्तोत्रे म्हणे.

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.