वाल्मिकींचे वर्णन आधुनिक ऐतिहासिक शैलीने केलेले नाही, म्हणून लोक त्यांना ऐतिहासिक रूपात स्वीकारत नाहीत. परंतु वाल्मिकींचा संसार हजार, दोन हजार वर्षांचा नव्हता. मग भले अर्व (अब्ज) वर्षांचा इतिहास आजच्या विकासाच्या चष्म्याने वाचता येणे कसे शक्य आहे ? अशा स्थितीमध्ये केवळ उपयोगी व्यक्तिंचाच इतिहास लाभदायक ठरतो. म्हणून आपल्याकडे इतिहासाची परिभाषाच वेगळी केली गेली आहे – धर्मार्थकाम मोक्षाणां उपदेशसमन्वितम् ।पूर्ववृत्तं कथायुक्तं इतिहासं प्रचक्षते ॥ (विष्णुधर्म ३.१५.१) रामायणात भूगोलावरही बरेच अनुसंधान झाले आहे. कल्याणचा ‘रामायणाङ्क’, Cunningham ची Ancient Dictionary व Dey यांची Geographical Dictionary यात यावर बरेच संशोधन आहे. कित्येक लोकांनी स्वतंत्र लेखही लिहिले आहेत. लंडनच्या Asiatic Society Journal मध्ये एक महत्त्वाचा लेख छापला होता. ‘वेद धरातल’ (पं. गिरिशचंद्र) यातही काही चांगली सामग्री आहे. केवळ ‘लंके’वर अनेक प्रबंध आहेत. वा.रा. १.२२ मध्ये उल्लेखिलेली कौशाम्बी प्रयागपासून १४ मैल दक्षिण-पश्चिम दिशेस कोसम नामक गाव आहे. धर्मारण्य ही आजची गया आहे. कुशनाभाचे महोदयनगर त्याच्या कन्यांच्या कुब्ज होण्यामुळे पुढे कान्यकुब्ज व त्याचेच परत कनौज झाले. गिरिव्रज हे आजचे राजगिर (बिहार) आहे..२४ मधील मलद करुष आता आरा जिल्ह्याचा उत्तरी भाग आहे. केकयदेश काही लोक ‘गजनी’ला तर काही झेलम एवं कीकनाला म्हणतात. बालकाण्ड २.३-४ मध्ये उल्लेखिलेली तमसा नदी, जिच्या काठी वाल्मिकींचा आश्रम होता; ही दुसरी एक तमसा नदी, जिचा उल्लेख गंगेच्या उत्तरेस व अयोध्येच्या दक्षिणेस असा मिळतो, त्याहून सर्वथा भिन्न आहे. वाल्मिकी आश्रमाचा उल्लेख २.५६.१६ मध्येही आला आहे. पश्चिमोत्तर शास्त्रीय रामायणाच्या २.११४ मध्ये देखील या आश्रमाचा उल्लेख आहे. बी. एच्. वडेर यांनी कल्याणचा रामायणाङ्कात (पृष्ठ ४९६) हा प्रयागपासून २० मैल दक्षिणेस आहे असे लिहिले आहे. सम्मेलनपत्रिका ४३/२ च्या पृष्ठ १३३ वर वाल्मिकी आश्रम प्रयाग – झांसीरोड व राजापुर – माणिकपुर रोडच्या संगमावर स्थित असल्याचे सांगितले आहे. गोस्वामी तुलसीदासांच्या मताप्रमाणे वाल्मिकींचा आश्रम वारिपुर दिग्पुरच्या मध्ये (विलसतिभूमि) होता. मूल गोसाई चरित्रकार ‘दिग्वारिपुरा मधील सीतामढी’ ला वाल्मिकी आश्रम मानतात. २.५६.१६ च्या टीकेत कतक, तीर्थ, गोविन्दराज, शिरोमणिकार आदि याचे विवरण करताना लिहितात की महर्षि प्रायः हिंडत राहात असत. श्रीरामांच्या वनवासाच्या वेळी ते चित्रकूटाच्या समीप आणि राज्यारोहण काळात गंगातटावर बिठूर येथे राहात होते. वा.रा ७.६६.१ तथा ७.७१.१४ यावरूनही वाल्मिकाश्रम बिठूर येथेच सिद्ध होत आहे. अन्य विवरण प्रायः प्रस्तुत ग्रंथाच्या टिप्पणीमध्ये दिले गेले आहे.या प्रास्ताविकासहित श्रीवाल्मीकि रामायणाचा मराठी अनुवाद सांगली निवासी श्रीमति कमलताई वैद्य यांनी केला आहे
(E Book 27) डॉ वि ह कुलकर्णी सरांना आठवताना
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 29) कॅप्टन रोवे - एक मनस्वी व्यक्तिमत्व
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 28) वाल्मिकी रामायणातील भौगोलिक स्थाने, व्यक्ती परिचय in E and M
Description
Discounted E-books
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
(E Book 209) Shivaji Maharaj A visionary of Indian Navy
(E Book – 240) शिवाजी महाराज का पहला समुद्री नौका वहन
(E Book 217) नौदलाचे-स्वप्नद्रष्टा-शिवाजी-महाराज
(E Book 218) भारतीय नौसेना के स्वप्नद्रष्टा
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 28) वाल्मिकी रामायणातील भौगोलिक स्थाने, व्यक्ती परिचय in E and M” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.