महाराजांना सागरी प्रवासातील त्रास व धोके यातून नवे अनुभव मिळाले. सागराच्या डचमळत्या हेलकाव्यामुळे पोटातले बाहेर पडते. दमटपणाने, घामाने हैराण व्हायला होते. लहरी हवामान, वादळी सुसाट वारे अनुभवले.


गोकर्ण बंदरातील शांत सागर आणि महाबळेश्वर मंदिरातील पवित्र वातावरणात आपल्या नौदलाच्या संकल्पना आकारू लागल्या.
- vपोर्तुगीज, डच, इंग्रज, अरब, सिद्दी, विजापुरकर यांच्या, वाहतूक बोटी,चाच्यापासून चोरट्यांचा सुळसुळाट, मासेमारी, मीठ बनवायचे व्यवसाय विना व्यत्यय चालू राहायला तटांची सुरक्षा वगैरे गरजा समजून आल्या.
- vजमिनीवरील राजकारणातून उसंत मिळाल्याने उत्तरेला भिवंडी-कल्याण, ते दक्षिणेत बसरूर, कारवार, गोमांतक किनारा हे आपल्या राज्याचे, सर्वात महत्वाचे क्षेत्र, म्हणून कोकणपट्टीच असू शकते. हे मनात ठसले.
- भावी काळात घाटावरील किल्ले,जमिनीचा महसूल गमावला गेला तर सह्यपर्वताचे कडेकपारी, दाट जंगल आणि कोकण किनाऱ्यावरील मालवाहतूक, व्यापार आपल्याला वाचवू शकतात.
- vतटसुरक्षित करायला जलदुर्ग, सुसज्ज नाविक दल याशिवाय पर्याय नाही. भावी काळात याच भागात राजधानी बनली पाहिजे. असे मत प्रकर्षाने दृढ व्हायला लागले.





Reviews
Clear filtersThere are no reviews yet.