ओपन विद्याधर आपली प्रतिक्रिया नोंदवतात…
आपण दाखवलेला नकाशावरील मार्ग —
सुरत–सोंगढ–नंदुरबार–साक्री–सटाणा–मालेगाव–नांदगाव–लासूर–औरंगाबाद —
हा ऐतिहासिक दृष्ट्या (त्यानी सुचवलेल्या मार्गापेक्षा )अधिक वास्तववादी आणि व्यवहार्य मार्ग वाटतो.
त्याचे काही ठोस कारणे अशी:
भौगोलिक सुसंगती:
हा मार्ग पठारी आणि नदीखोऱ्यांतून जातो (तापी–गिरणा–गोदावरी खोऱ्या), त्यामुळे प्रवास तुलनेने सपाट आणि वेगवान होता.
गनिमी प्रदेश टाळणे:
तो थेट पश्चिम घाटाच्या डोंगराळ भागातून न जाता, मराठा टोळ्यांची सक्रियता असलेले प्रदेश टाळतो. त्यामुळे मुगल दूत वा व्यापारी यांना सुरक्षितता मिळत असे.
मार्गातील ऐतिहासिक केंद्रे:
सोंगढ, मालेगाव, लासूर ही ठिकाणे मुगलकालीन मार्गांवरची प्रमुख विश्रांती ठाणी (सराई / चौकी) होती.
रीले दळणवळणाची साखळी:
या मार्गावर अनेक मुगल चौक्या होत्या, जिथे दूत एका टप्प्याचा प्रवास करून पुढच्या दूताकडे बातमी देत. त्यामुळे सुरतेच्या लुटीची बातमी ३४० किमी अंतरावर असलेल्या औरंगाबादपर्यंत २–३ दिवसांत पोहोचू शकली असावी.
सुरतहून मिळवलेल्या संपत्तीच्या रक्षणासाठी, दाऊदखानाने सिवाला तांड्यांसोबत राहून संघर्ष करावा लागेल, हे लक्षात घेतले.
त्याच्या सैनिकांनी ‘सिवा’च्या सैन्याला गुंतवून ठेवून, तांड्यातील मालजनावरांच्या चालकांना ताब्यात घेऊन, शक्य तितकी संपत्ती सूरतेच्या मालकांकडे परत करणे हे ध्येय ठरवले.
रणक्षेत्राची रणनीती:
मुगलांच्या सैन्यात काम करणाऱ्या भीमसेन सक्सेना यांनी याबाबत तपशील दिला आहे.
डॉ. श्रीनिवास सामंत, प्रा. नामदेव जाधव, आणि श्री गजानन मेहेंदळे यांनी विविध संदर्भ तपासून निष्कर्ष काढले आहेत.
या लढाईचे रणक्षेत्र एकच ठिकाण, खिंड, गाव किंवा रस्ता असे मानण्याऐवजी, शिवाजी महाराजांच्या सेनेवर वाटेत पकडून दाऊदखानाने हल्ले केले. पण मराठा सैन्याने मुगल सेनेला जबर जखमी करून नामोहरम अवस्थेत पाठलाग करणे सोडून द्यायला लावले.
तांड्याची हालचाल:
हजारो मालजनावरांच्या पाठीवरील ओझ्यातून नेत, तो तांडा कुठे कुठे थांबत गेला?
मधल्या मधे कुठे तरी थांबून इतर ठिकाणाहून हल्ले करून हस्तगत करून, मग टप्प्या टप्प्याने पोचला का?
महाराज तो रायगडवर पोहोचेपर्यंत बरोबर होते का?
मालवाहक जनावरांच्या चाऱ्याचा, विश्रांतीचा, आणि पुन्हा अदलाबदलीसाठी कुठेतरी थांबायला लागले असेल तर ते कुठे असावे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे, कारण यामुळे लढाईच्या रणनीती आणि तांड्याच्या हालचालींचा अधिक स्पष्ट आढावा घेता येईल.
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.