2024 E Book 11 चार पोथ्यांची माहिती.
पोथी वाङ्मयातील हा भाग समजून घ्यायला रंजक वाटेल.
लीळाचरित्र सु. १२७८ मध्ये म्हाइंभट्टांनी (मृ.सु. १३००) महींद्र व्यास उर्फ म्हाइंभट्ट ह्यांनी संकलित केलेला लीळाचरित्र हा या पंथातील पहिला ग्रंथ होय. चक्रधरांच्या महानिर्वाणानंतर त्यांच्या आठवणी ऊर्फ लीळा लिहून काढण्याची प्रेरणा म्हाइंभट्टास झाली.
‘श्रीभक्तविजय’ ‘श्रीसंतलीलामृत’ ‘श्रीभक्तलीलामृत’ कर्ते महिपतीबोवा – बोवांचा जन्म इ. स. १७१५ (शके १६३७) मधला. मोगलाईतील ताहराबाद हे त्यांचे जन्मस्थान. त्यांचे संपूर्ण नाव महिपती दादोपंत कांबळे. हे ऋग्वेदी वसिष्ठ गोत्री ब्राह्मण.
सुमारे चाळीस हजार ओव्या लिहुन ‘संत चरित्रकार’ कविवर्य महिपतिबोवा ताहराबादकर यांनी मराठी भाषेत खरोखरच एक अमोल कामगिरी केली आहे. त्यांचे ‘श्रीभक्तविजय’ ‘श्रीसंतलीलामृत’ ‘श्रीभक्तलीलामृत’ यासारखे रसाळ ग्रंथ मराठी भाषेचे अमोल लेणे ठरले आहेत. आपल्या काव्य गंगेने त्यांनी लक्षावधी मराठी वाचकांना खरोखरच पावन करून टाकले आहे! लिखाणातील प्रांजलपणा हा या सर्वाचाच जो विशेष गुण, तो यांच्या आत्मचरित्रांना विलक्षण सच्चेपणाची जोड देतो.



Reviews
Clear filtersThere are no reviews yet.