•संत साहित्य, विशेषतः औलिया संत चरित्राच्या पोथ्यांचा देवघरात ठेऊन रोज किंवा परिपाठाने, सप्ताह किंवा पारायण करण्यासाठी उपयोग केला जातो. त्या लेखनातील अदभूतता इतरांना आलेले अनुभव आणि श्रद्धा भाव याच्या प्रभावाने पोथी साहित्याकडे ‘खाजगीत श्रद्धेने उपयोगात आणायची बाब’ असे संबोधून चिकित्सकपणे कमी पाहिले जाते. पारायणासाठी किंवा रोजच्या नित्यनियमातून वाचनाला ठराविक जागेचे, वेळेचे, सोवळे, भोजनादि बंधन येते. वाचताना थांबून न कळलेल्या शब्दांचे अर्थ, संकल्पना, आपल्यावर अशी वेळ आली तर प्रसंगी कसे वागायचे, यावर विचार करायला बंधन येते. पोथीतील कथनाबाबत प्रश्न पडले तरी विचारायची सोय नसते. विविध कारणांनी वाचन तसेच पुढे चालू राहते.
•हवाईदलातील सन १९८१ ते १९८६ कालातील माझ्या सेवेत नवी दिल्लीमधील वेस्टर्न कमांड मुख्यालयात पोस्टींगमधे असताना विवाहितांना सिव्हिलियन भागात घर करून राहायला परवानगी असे. मला जनकपुरीत घर मिळाले. तिथे सी २-२२० बंगल्यात राहात असताना १९८५ साली ‘जर प्रचिती येईल तर वाचन करेन’ असे थोडेसे आव्हानात्मक बोलून मी वाचायला सुरवात केली. आणि खरोखरच तशी प्रचिती वाचनाच्या तिसऱ्या दिवशी पासून मिळत राहिली. त्या मधून ‘अंधार छाया’ नावाने मराठी कादंबरीचे लेखन आपोआप चालू झाले. एकदा कोर्ट कचेरीच्या दुष्ट किटाळातून ‘बाइज्जत’ सुटका झाली. नंतरच्या काळात नाडी ग्रंथ भविष्य या त्यावेळपर्यंत भारतीयांना काहीसा अज्ञात विषयातून अनेकांना मार्गदर्शक होईल असे समाजकार्य घडले. असो.
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.