(E Book 177) पुर्वजन्मातील त्रास भोगूनच संपवावा भाग १२

 

Original price was: ₹50.00.Current price is: ₹20.00.

Description

भाग १२ पत्नीच्या खुनाच्या व फाशीच्या शिक्षेच्या विस्तृत स्मृती मात्र त्याच्या प्रौढपणी सुध्दा अगदी ताज्या राहिल्या.

 लग्नाची बायको नवऱ्याची आज्ञा न पाळणे ही आपल्या समाजातील एक सर्वसामान्य गोष्ट असून अशा वेळी सामोपचाराने तिची समजूत काढण्याचा प्रथम प्रयत्न करावा. त्या प्रयत्नाला यश आले नाही तर शेवटी तिला घटस्फोट देणे हाच योग्य मार्ग आहे. कारण अनावर झालेल्या क्रोधाचा परिणाम म्हणून अनेकाची जीवित हानी होऊ शकते असे शेवटी त्याने म्हटले असून, या संदर्भात बुद्धाच्या सहिष्णुतेच्या शिकवणुकीचा पाठपुरावा त्याने केला आहे. वरील पत्रावरून विजेरत्नेचा व्यक्तिविकास झाला असल्याचे दिसून येते. पण तो सहजासहजी झालेला नाही. ही किंमत या जन्मात त्याला मोजावी लागल्याचे दिसते. उदाहरणार्थ तो हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना एका मुलीकडे आकर्षित झाला. तिनेही त्याला थोडा प्रतिसाद दिला. पण नंतर तिने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्याने ती मागच्या जन्मातील पोदी मोनिके असल्याचा समज करून घेतला होता. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचा त्याच्या मनावर मोठा आघात झाला व तो मनोरुग्ण बनला. वडील तिलेरत्ने यांना त्याला मनोरुग्णांच्या इस्पितळामध्ये ठेवावे लागले. बरेच दिवस तेथे त्याला काढावे लागले, पण शेवटी तो त्या मनोरोगातून सावरला. तथापि शिक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष होऊन काही वर्षे फुकट गेली, मागच्या जन्माती घटनांचा किंवा त्यांच्या आठवणींचा हा परिणाम मानता येईल, शिवाय चौदाव्या वर्षी पूर्ण एक आठवडा तो स्वतःला पक्षी समजून झाडांच्या फांद्या मोडू लागला होता, इतर प्राण्यांच्या योनीत माणसाचा जन्म होतो या बौध्द धर्मातील श्रध्देचा हा परिणाम असू शकतो असे स्टिन्टेन्सन यांनी म्हटले आहे.

तिने सांगितले की आपण मागच्या जन्मात अत्यंत श्रीमंत वकील होतो. आपण स्त्रियांचे शोषण केले होते. त्यामुळे आपल्याला परमेश्वराने शोषण झालेल्या स्त्रियांचा अनुभव काय असतो हे कळण्यासाठी स्त्रीच्या जन्मात शिक्षा म्हणून घातले आहे. त्यासाठी श्रीमंत असलेल्या आपल्याला गरीब जीवन जगण्यास भाग पाडले आहे.

मद्रास जवळील तांबरम् येथील नाडी केंद्रात त्याच्या नावाचा ग्रंथ मिळाला. त्यात तो मागच्या जन्मात स्त्री असल्याचे व त्या जन्मात तिने कित्येक पुरुषांचे शोषण केल्याचे वर्णन आढळले. मागच्या जन्माची त्याला आठवण होत नसली तरी या जन्मात त्याबद्दलची शिक्षा म्हणून तिने स्त्रीजन्मात शोषण केलेल्या पुरुषांचा अनुभव काय असतो हे कळण्यासाठी तिला पुरुष जन्म मिळाला व बरीच वर्षे तो मनोरुग्ण (psychotic) बनला. ही शिक्षा असल्याचे एक लक्षण म्हणजे तो मानसोपचार करून घेण्यास मुळीच तयार नव्हता. आम्हाला त्यासाठी त्याच्यावर शेवटी जबरदस्ती करावी लागली. रोगातून बरे होण्यास, त्याला बरीच वर्षे लागली. म्हणजे त्या त्रासाचा पुरता भोग भोगूनच तो संपवावा लागला. कदाचित त्याच्या एखाद्या जन्मातील पुण्य कृत्यामुळे किंवा आमच्याशी असलेल्या त्याच्या पूर्व नात्यामुळे त्याला आमच्या आध्यात्मिक कुटुंबात जन्म मिळाला असावा. तो नंतर मोठा ईश्वरनिष्ठ व अध्यात्मवादी बनला. त्या शिवाय आपल्या विषयात श्रेष्ठ तज्ञ बनून विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून शिक्षणक्षेत्रात मोठा नावलौकिक मिळविला आहे.

(Reincarnation and Biology: Ian Stevenson, cases of Rein –
carnation Type – Vol. II, Ian Stevenson, Children Who

Discounted E-books

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 209) Shivaji Maharaj A visionary of Indian Navy

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 217) नौदलाचे-स्वप्नद्रष्टा-शिवाजी-महाराज

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 218) भारतीय नौसेना के स्वप्नद्रष्टा

Original price was: ₹2,000.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “(E Book 177) पुर्वजन्मातील त्रास भोगूनच संपवावा भाग १२”

Your email address will not be published. Required fields are marked *