
श्री. वऱ्हाडपांडे यांच्या चिखलफेकीचे कारण –
‘पैलतीर’ १९९५ च्या दिवाळी अंकातील माझ्या ‘विवेकवाद आणि गूढानुभूतिवाद’ (प्रस्तुत ग्रंथातील प्रकरण १०) या लेखाला श्री. नी. र. वऱ्हाडपांडे यांनी ‘प्राचार्य गळतगे यांचे बौद्धिक अपचन’ या मथळ्याचा वैयक्तिक पातळीवर उतरून चिखलफेक करणारा (Personal Vilification) लेख लिहून उत्तर दिले आहे.
वऱ्हाडपांड्यांचा हा लेख वाचणाऱ्यांना त्यांच्या ‘विवेकवादा’ वरील माझ्या टीकेमुळे त्यांच्या मनाचा तोल कसा पूर्णपणे सुटला आहे याची तीव्र जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. वास्तविक ज्यांची भूमिका शास्त्रीय पायावर भक्कम उभी आहे व म्हणून सत्य आहे, त्यांनी ती भूमिका, प्रतिपक्षाने तिच्यावर कितीही हल्ला केला तरी, भंगणार नसल्यामुळे स्वतः च्या मनाचे संतुलन बिघडू देण्याचे काहीच कारण नाही, आणि वऱ्हाडपांडे आपला ‘विवेकवाद’ विज्ञानाधिष्ठित असल्याचा दावा करीत असल्यामुळे त्यांच्याबाबतीत ही भीती संभवतच नाही. मग त्यांनी आपल्या मनाचे संतुलन बिघडू देण्याचे व प्रतिपक्षावर चिखलफेक करण्याचे कारण काय? एक तर त्यांच्या ‘विवेकवादा’ ची भूमिका विज्ञानधिष्ठित नाही व म्हणून सत्य नाही, किंवा त्यांच्या ‘विवेकवादा’त विवेकाचा तीव्र अभाव आहे, किंवा दोन्ही खरे आहेत असे म्हणावे लागते. याविषयीचे सत्य माझ्या उपर्युक्त ‘पैलतीर ९५‘ मधील लेख (प्रस्तुत ग्रंथातील प्रकरण १०) ज्या वाचकांनी वाचला आहे त्यांना मुद्दाम उघड करून सांगण्याची आवश्यकता नाही. तथापि, या विषयात विज्ञानच साक्षीला उभे असल्यामुळे ‘हा सूर्य व हा जयद्रथ’ हा याय लागू होतो. हा याय वाचकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखाद्वारा वऱ्हाडपांड्यांच्या लेखामुळे मला पुऱ्हा करावा लागत आहे.
गूढानुभूतीची भूमिका
गूढानुभूती खोटी ठरविल्याशिवाय ‘विवेकवाद‘ उभा राहू शकत नसल्यामुळे (निदान अशी वऱ्हाडपांड्यांची समजूत झाली असल्यामुळे) वऱ्हाडपांड्यांनी आपल्या विवेकवाद या पुस्तकाच्या पहिल्याच विवेकवाद म्हणजे काय?’ या प्रकरणात गूढानुभूतीवर हल्ला चढवला आहे. हा हल्ला वैज्ञानिकदृष्ट्या कसा आंधळा आहे हे मी माझ्या उपर्युक्त लेखात साधार दाखवून दिले आहे. हे दाखवून देताना मी गूढानुभूतीची भूमिका पुढीलप्रमाणे मांडली आहे.
१. गूढानुभूती आलेल्या (समाधिसिद्ध ) पुरुषाला व्यावहारिक पातळीवरील (जागृतीतील) स्थलकालयुक्त जग व्यावहारिक पातळीवर (जागृतीत) खोटे आहे असे म्हणायचे नसते.
२. गूढानुभूतीचे ज्ञानात्मक मूल्यमापन भौतिक ज्ञानाच्या पातळीवरून (भौतिक ज्ञानाच्या मापदंडाने) करणे चुकीचे आहे. यामुळे गूढानुभूतीच्या सयाची कसोटी भौतिक सयाच्या कसोटीहून भिन्न ठरते. (भौतिक ज्ञानाची कसोटी वापरून गूढानुभूतीचा खरेखोटेपणा ठरवता येत नाही.)
३. गूढानुभूतीत स्थलकालातीत अशा निरपेक्ष (Absolute) आणि अंतिम (Ultimate) सत्याची जाणीव होते. ही जाणीव जितकी खोल तितकी एकात्मतेची भावना दृढ आणि तितकीच जगाविषयीची प्रेम, करुणा, आत्मीयता इयादी भावना बलवत्तर बनते. (व्यावहारिक दृष्ट्या जग खोटे म्हणणाऱ्यांच्या ठिकाणी अशी भावना असणार नाही.)

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.