
भौतिकवाद हाच मुळात खोटा
डार्विनचा उत्क्रांतिवाद ज्या भौतिकवादावर आधारलेला असल्यामुळे खोटा ठरतो, तो भौतिकवादच खोटा असल्यामुळे खोटा ठरत असल्यामुळे भौतिकवाद हाच मूळात खोटा का व कसा ठरतो, हे पाहणे अगत्याचे आहे. कारण त्यामुळे डार्विनच्या भौतिकवादी उत्क्रांतिवादाच्या खोटेपणावर अखेरचे शिक्कामोर्तब होते.
वस्तुतः भौतिकवादाचे मूळ खुद्द भौतिक विज्ञानातीलच क्वाँटम मेकॅनिक्सच्यामुळे उखडले गेले आहे ! तरीसुद्धा ज्याला विज्ञानाचा मुख्य प्रवाह म्हणतात त्या प्रवाहातील शास्त्रज्ञ अजूनही भौतिकवादीच आहेत; म्हणजे क्वाँटम मेकॅनिक्सचे चेतनाच्या बाजूने निघणारे तत्त्वज्ञानात्मक निष्कर्ष मान्य करायला तयार नाहीत, हे एक मोठेच आश्चर्य आहे. त्यांना भौतविज्ञानातील सिद्धांताने भौतिकवादाच्या मर्यादा दाखवून दिलेल्या असताना सुद्धा त्या समजलेल्या नाहीत असाच याचा अर्थ होतो. पण आपले हे अज्ञान आहे हे त्यांना मान्य नाही ! क्वाँटम मेकॅनिक्सवरच आपल्या या अज्ञानाचे खापर फोडून मोकळे होताना ते दिसतात ! म्हणजे क्वाँटम मेकॅनिक्सलाच ते दोष देतात. उदाहरणार्थ रिचर्ड फेनमन हा प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ म्हणतो, “माझ्या विचारानुसार मी असे सुरक्षितपणे विधान करू शकतो की क्वाँटम मेकॅनिक्स कोणालाच समजत नाही.” (‘I think I can safely say that nobody understands quantum mechanics.’ The Character of Physical Law – R. Feynman 1965 P. 129)

आता जो क्वाँटम मेकॅनिक्सचा सिद्धांत प्रयोगाने सिद्ध झाला आहे, तो कोणत्याही शास्त्रज्ञाला समजत नसेल तर तो त्या क्वाँटम मेकॅनिक्सच्या सिद्धांताचा दोष आहे काय ? तथापि क्वाँटम मेकॅनिक्सचा प्रयोग कोणत्याही शास्त्रज्ञाला समजत नसेल तर तो जादूचाच प्रयोग आहे असे ठरते ! कारण जादुच्या प्रयोगाची कारणमीमांसा भौतिक तत्त्वांच्या व नियमांच्या आधारे भौतशास्त्रज्ञांना करता येत नाही ! त्यामुळे त्या प्रयोगाने सिद्ध झालेला सिद्धांत भौतिकवादी शास्त्रज्ञांच्या दृष्टीला (बुद्धीला) समजत नाही ! आणि जे बुद्धीला समजत नाही त्याला बाइक महटले पाहिजे आणि खरोखरच जे. ए. व्हीलर या भौतशास्त्रज्ञांनी क्वाँटम मेकॅनिक्सला प्रत्यक्षात जादूच जे बुद्धीला समजत नाही त्याला जादूच म्हटले पाहिजे ! आणि खरोखरच म्हटले आहे !
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.