प्रश्न : ‘गहना कर्मणो गतिः’ हे वचन भगवद्गीतेतील ज्या श्लोकात आले आहे , त्या श्लोकाचा संदर्भ व तुम्ही त्या वचनाचा करीत असलेला अर्थ यांचा मेळ बसत नाही. प्रश्न : परंतु कार्यकारणभाव स्थायिक नाही, वैश्विक आहे या शोधाचा कर्मसिद्धांताशी, कर्माची गती गहन आहे या गोष्टीशी नेमका कुठे संबंध येतो ?
परंतु तुम्ही सामान्य मनुष्य किंवा योगी यांचे हे कर्म आहे असे न म्हणता हे विश्वाचे कर्म आहे, विश्वरूपी नाटककाराचे कर्म आहे‘ असे का म्हटले आहे ?
उत्तरः होय. विश्वाचे म्हणजे विश्वरुपी नाटककाराचे हे ‘कर्म’ आहे असे मी म्हटले आहे.पण हे ‘कर्म’ कोणते वा कोणाचे ‘कर्म’? संपूर्ण विश्वाचे ‘कर्म’ म्हणजे सामान्य मनुष्य आणि योगी यांच्या सकट सर्व जीवांचे, किंबहुना दगडासारख्या निर्जीव वस्तूंचे सुद्धा कर्म! आणि ते कर्म सामान्य माणसांच्या तर्कबुद्धीला अगम्य आहे असे मी म्हटले आहे. का अगम्य आहे? तेही त्याच ठिकाणी विज्ञानाच्या क्वांटम सिद्धांताच्या आधारे स्पष्ट केले आहे. उदा. पुढे लगेच मी म्हटले आहे, “विश्वातील सर्व घटना कार्यकारणभावानुसार (casuality)घडत असल्याचे दिसत असल्या तरी ह्यूम ने दाखवून दिल्या प्रमाणे त्या कार्यकारणभावाला कसलाच तार्किक आधार नाही. तर्कबुद्धी कार्यकारणसंबंध (कर्मसिद्धांत) स्थानिक पातळीवर म्हणजे विश्वाचे तुकडे करून समजावून घेण्याचा प्रयत्न करते. पण क्वांटम सिद्धांतानुसार विश्वाचे तुकडे करता येत नाहीत. त्यामुळे कार्यकारणसंबध (कर्मसिद्धांत) तर्कबुद्धीला स्थानिक पातळीवर कळणे अशक्य आहे. त्यासाठी तर्कबुद्धीला स्वतःसकट संपूर्ण विश्वाचे ज्ञान करून यावे लागेल आणि हे अशक्य आहे. त्यामुळे कार्यकारणभाव (कर्मसिद्धांत) तर्कबुद्धीला अगम्य आहे. गहना कर्मणो गतिः । (प्रज्ञालोक क्र. २४६, पृ. ११) स्वतःसकट संपूर्ण विश्वाचे ज्ञान सामान्य माणसाला शक्य नसले तरी वर गीतेत म्हटल्याप्रमाणे) योग्याला शक्य आहे. कारण तो ईश्वरस्वरूप झालेला असतो. म्हणून त्याच्या दृष्टीने ‘कर्मा’चे ज्ञान मुळीच गहन (अगम्य) नाही, तात्पर्य, कर्माची गती गहन आहे ते सामान्य माणसाला, योग्याला नव्हे. आणि गीता तेच सांगते आहे. ।

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.