वणी दिंडोरी मार्गावरील जोरदार झडपांमुळे दमलेल्या मुगल सैन्याला विश्रांती व औषधोपचार घेत तळावर अडकून पडावे लागले असेल. पिंपळगाव (बसवंत) मार्गाने नाशिकमधील मुगलांचा तळ चुकवला तर तांडा सिन्नरच्या चढावरून संगमनेरच्या जकातनाक्याआधी अकोलेच्या वाटेला प्रवरानदीच्या काठाने कोतुळपाशी आल्यावर महाराजांना वाटाड्यांच्या माहितीतून कुंजरगडाची रचना आणि तिथे असलेले भुयारवजा नैसर्गिक बोगदा आपल्या किमती सामानाला लपवून हप्त्या हप्त्याने कोकणातील घाटातून न्यायला शक्य आहे असे कळल्यावर महाराजांनी लमाणांना पैसे चुकते करून देऊन, ते दूर गेल्याचे पाहून आपल्या सैनिकांना मोत्यांची पोती, जड–जवाहिरांच्या पेट्या, इतर माल डोक्यावर वाहून कुंजरगडाचा अत्यंत अवघड चढ चढून ते सामान भुयाराच्या पोकळीत लावून त्याला दोन्ही बाजूंनी बांधकाम करून सील केले असावे.
ठोस निष्कर्ष
- कुंजरगड व तत्सम दुर्गम डोंगरकिल्ल्यांवरील गुहा, स्थानिक संतती, नैसर्गिक साठा आणि पहार्याचा लाभ उठवून, तात्पुरत्या सेफ डिपॉझिटसारख्या वापरण्यात आले असाव्यात हे फार व्यवहार्य आहे.
- ही कल्पना केवळ उक्ती नव्हे, तर छत्रपतींनी वेळोवेळी दाखवलेल्या “सुरक्षा-प्रथम, धाडसी-परंतु-शिस्तबद्ध” रणनितीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
- अशा नैसर्गिक गुहा-किल्ल्यांचा वापर अत्यंत रणनीतीपूर्वक आणि प्रभावीपणे झाला असावा हे मानायला पुरेसा ऐतिहासिक संभव व तर्क आहे.
- सन १६७०च्या आधीपासून राजगडावरून राजधानी रायगडावर हलवायची आज्ञा मिळाल्याने राजगडावरून थोडे थोडे करून एक एक विभागाचे सामान आणि त्या संबंधीची नोकरमंडळी, कुटुंबे यांना राहायची व्यवस्था करायला सुरवात झाली असावी. जून महिन्यात मोसमी पावसाच्या तडाख्याआधी आधी सगळे विभाग, रसद, बाजार, तातपुर्ती राहायची घरे याची व्यवस्था करायचे हुकुम महाराजांनी सुरतला जाताना दिले असावेत. पुढील काही वर्षांत रायगडावर थाटाच्या राज्याभिषेकासाठी सुरतेहून आणलेला किमती माल वापरायला लागणार होता. शानदार राजसिंहासन, त्याला सोन्याचे आवरण, दरबारातील गालिचे, झुळझुळीत पडदे, शामियाने यासाठी जहाजावरून आणलेले भपकेबाज कापडचोपड आणि लाकडे , सोने, चांदी अनेक तऱ्हेची रत्त्ने, पोतीच्या पोती मोती यातून कलापूर्ण निर्मिती करणारे कुशल कारागीर यांना जहाजातून आणले गेले होते. त्यांना रायगडाच्या पायथ्याशी वसाहत करून देण्याचे हुकुम महाराजांनी दिले.

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.