(E Book 53) लढा पावन खिंडीतला – वाटाडे – भाग १. ८४ slides

(4 customer reviews)

 

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

Description

पन्हाळ्यामधून सुटका करून घेण्याच्या

 महाराजांच्या मोहिमेत सर्वात महत्त्वाचे होते ते म्हणजे त्यांचे वाटाडे हे वाटाडे कोण असावेत? त्यांची निवड महाराजांनी कशी केली असावी? 

पन्हाळ्यामधून सुटका करून घेण्याच्या महाराजांच्या मोहिमेत सर्वात महत्त्वाचे होते ते म्हणजे त्यांचे वाटाडे.

हे वाटाडे कोण असावेत? त्यांची निवड महाराजांनी कशी केली असावी? या वाटाड्यांना योग्य तो रस्ता खरोखरच दाखवता आला का? त्यांच्या हातून काही गफलत तर झाली नसेल? आणि झाली असेल तर त्यावर मात महाराजांनी कशी केली असावी या सर्व बाबी मिलिटर कमांड़रांच्या आखणीच्या कारवाईत फार महत्वाच्या ठरतात. या अंगाने प्रस्तूती करायचा प्रयत्न.

अस्सल कागदी पुराव्यांची कमतरता, लेखन करायची गरज न वाटणे, उसंत न मिळणे व अन्य कारणांनी मराठ्यांच्या इतिहासाला ज्ञात लढ्याच्या घटनांच्या तपशीलवार नोंदी कमी असल्याचे जाणवते. जी उपलब्ध साधने आहेत त्यांतील सत्यासत्यता, इतिहास लेखन करणाऱ्यांचे हेतू व पुर्वग्रह वगैरे आणखी व्यत्यय असू शकतात.

यातून असे वाटते की …

जर आजच्या मिलिटरी कमांडरला (तो स्वतः) शिवाजी महाराज आहे व बाजीप्रभूंसारखे सरदार साथीला असतील असे मानले तर ते सध्याचे (मिलिटरी कमांडर ) -शिवाजी महाराज- त्या काळातील उपलब्ध परिस्थितीत लढ्याचे नियोजन कसे करतील? हातात घड्याळ नाही, डोळ्याला चष्मा नाही, पायात बूट नाहीत, पेटवायला आगपेटी नाही. अशा त्या काळातील उपयोगातील नियंत्रित वस्तूंना, शस्त्रसंभाराला वापरून – तलवारी, भाले, गोफणी, क्वचित सेनेकडे ठासणीच्या बंदुका, तोफांच्या मारा करायची कला व साहित्य असेल इतपत प्रगत दूरमारक शस्त्रे अशा अंगाने विचार करायला हा धागा प्रवृत्त करत आहे… यातून त्या लढाईच्या घटनांच्या निदान ७० ते ८० टक्के जवळपास आपण जाऊ शकतो का?

आपणांपैकी सेनेबाहेरील अभ्यासू सदस्यांनी आणि सेना दलातील माहितगारांनी यावर आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग करून काय व कसे नियोजन करता आले असेल. प्रत्यक्ष घटना घडताना त्या नियोजनात वेळोवेळी बदल करून शेवटी सुरक्षितपणे गडावर कसे ते पोहोचले असावेत यावर लिहावे. मी देखील माझ्या बाजूने प्रयत्न करीन. मी ठरवेन तेच खरे असा अभिनिवेश नसावा. अनेक शक्यता पडताळून पाहायला काय हरकत आहे?

समरूप किंवा तोतया शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली काही वाटाडे, पालखी सारख्या डोलीत महाराजांना ज्यांनी पाहिले होते अशांना ते महाराज असायची शक्यता निर्माण करेल असा पोषाख आणि आभूषणे घालून निघाले असावेत. पावसांच्या सरींनी चिंब भिजलेल्या तोतया शिवाजीं सोबत गेलेल्या सैनिकांना महाराज खरोखरच कोकणात जाणार नसल्याचे माहित नसावे इतकी गुप्तता ‘फक्त गरजेच्या लोकांसाठी’ तत्वावर पाळण्यात आली असावी. त्यांच्याकडे मसाई पठारावरून जाणाऱ्या अंबा घाटातील मार्गाचे वाटाडे असावेत.

Discounted E-books

(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 209) Shivaji Maharaj A visionary of Indian Navy

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 217) नौदलाचे-स्वप्नद्रष्टा-शिवाजी-महाराज

Original price was: ₹200.00.Current price is: ₹100.00.

(E Book 218) भारतीय नौसेना के स्वप्नद्रष्टा

Original price was: ₹2,000.00.Current price is: ₹100.00.

Customer Reviews

5
4 reviews
4
0
0
0
0

4 reviews for (E Book 53) लढा पावन खिंडीतला – वाटाडे – भाग १. ८४ slides

Clear filters
  1. Alka Oak

    अभिप्राय:

    हे प्रेझेंटेशन पावनखिंडीच्या लढाईचा केवळ एक ऐतिहासिक आढावा नाही, तर त्यामागील लष्करी रणनीती, भौगोलिक आव्हाने आणि मानवी धैर्याचे एक सखोल विश्लेषण आहे. विंग कमांडर शशिकांत ओक यांनी लष्करी दृष्टिकोनातून केलेल्या या मांडणीमुळे इतिहासप्रेमींना आणि विशेषतः लष्करी रणनीतीचा अभ्यास करणाऱ्यांना एक नवीन आयाम मिळतो. दस्तऐवजात दिलेल्या नोंदी आणि तपशील, अभ्यासकांना अधिक संशोधन करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

    प्रस्तुतीकरण काही ठिकाणी ‘असावे’ किंवा ‘असावेत’ यासारख्या शक्यतादर्शक शब्दांचा वापर करते, जे दर्शवते की सादर केलेली माहिती विविध स्रोतांवर आधारित आहे आणि त्यात तर्कशुद्ध विचार आहे. एकूणच, हे ई-बुक पावनखिंडीच्या लढाईचे एक सर्वसमावेशक आणि विचारप्रवर्तक विश्लेषण सादर करते, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आवड असलेल्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

  2. Alka Oak

    रसग्रहणात्मक लेखन:

    सैनिकी दृष्टिकोन: या प्रेझेंटेशनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘सध्याच्या भूसेना, वायुसेना, नौसेना तज्ज्ञ लष्करी अधिकाऱ्यांनी केलेली मांडणी’. यामुळे लढाईतील डावपेच, सैन्याच्या हालचाली, भौगोलिक परिस्थितीचे महत्त्व आणि दोन्ही बाजूंच्या लष्करी मर्यादा व सामर्थ्ये यांचा विचार अधिक बारकाईने केला गेला आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्याची संख्या आणि सिद्दी जोहरच्या सैन्याची रचना यावर विश्लेषणात्मक पद्धतीने भाष्य केले आहे.

  3. Alka Oak

    भौगोलिक आणि वातावरणीय आव्हाने: पावनखिंड – कासारी नदीच्या पात्राची घळ आणि पावसाळ्यातील या प्रदेशाची भीषणता याचे वर्णन प्रभावी आहे. ‘पावसाळ्यात दरीतील झाडीत लपलेल्या जवानांना वरून पाहणे देखील अवघड आहे’ आणि ‘भरपावसाळ्यात खिंडीतील जलप्रपाताचे रौद्ररुप’ यासारख्या वर्णनांमधून त्यावेळच्या नैसर्गिक अडथळ्यांची कल्पना येते. जळवांसारख्या किटकांमुळे सैनिकांना होणारा त्रास आणि त्याचा वेग मंदावण्यावर होणारा परिणाम देखील सूक्ष्मपणे मांडला आहे.
    ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे चित्रण: बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्यासह सिद्दी जोहर आणि सिद्दी मसूद यांची चित्रे आणि त्यांच्या भूमिकांचे वर्णन इतिहासाला जिवंत करते.

    संरचना आणि माहिती: प्रेझेंटेशनमध्ये पायदळ आणि घोडदळ यांच्या रचनेचे तपशीलवार वर्णन दिले आहे, ज्यात ‘बारगीर’ आणि ‘शिलेदार’ यांसारख्या सैन्य प्रकारांचा समावेश आहे. नकाशे आणि छायाचित्रांमुळे सादरीकरण अधिक प्रभावी झाले आहे.

  4. Alka Oak

    रणनीतिक विश्लेषण: प्रेझेंटेशनमध्ये शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाची निवड का केली आणि तेथून त्यांची सुटका कशी झाली, याचे संभाव्य लष्करी विश्लेषण केले आहे. नेताजी पालकरांचे प्रयत्न, तसेच सिद्दीच्या सैन्यातील विसंगती आणि फाजलखानाचे दरबारातील स्थान यावरही प्रकाश टाकला आहे. शिवाजी महाराजांनी आपला वेष बदलून शिवा काशीद यांना कसे पुढे पाठवले आणि त्यामुळे सिद्दीच्या सैन्याचा झालेला गोंधळ यावर विस्तृत चर्चा आहे.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *