
बोध अंधश्रद्धेचा ४ . पान १२९ ते १४३ भाग ५ व ६ पर्यंत वस्तुत: रिस्क (धोका) हा शब्द वापरून आपण आपली नाडी भविष्य विषयक खरी दृष्टी प्रकट केली आहे. कारण हा धोका आहे म्हणणे खरेच आहे! पण कोणत्या अर्थाने हा धोका आहे? आपल्या समितीचे ५ ला तिची अब्रू व तिचे महाराष्ट्रातील अस्तित्व हे सर्व गमावण्यच्या अर्थाने हा धोका आपण घेत आहोत म्हणजे खरोखर काय करीत आहात बरे?
‘आपला वार्ताहर’ मुंबईचे संपादक श्री. मुरलीधर शिंगोटे यांनी नाडीभविष्य हे पुस्तक लेखमालिकेच्या स्वरूपात जुलै ९६ मध्ये प्रकाशित केल्यामुळे मुंबई व उपनगरातील वाचकांची उत्सुकता प्रचंड प्रमाणात जागृत झाली. आणि ५ हजार प्रतींची पहिली आवृती २ वर्षांपेक्षा कमी काळात संपून गेली. पुण्यातील सुप्रसिद्ध प्रकाशन संस्था जोशी ब्रदर्स अप्पा बळवंत चौक, – यांच्यातर्फे ‘नाडीभविष्य’ पुस्तकाची विस्तारित आवृत्ती एप्रिल ९७ मध्ये प्रकाशित झाली. पाने १४६ किंमत ६० रुपये. ‘नाडी भविष्य चौका देनेवाला चमत्कार’ अशी हिंदी आवृत्ती डायमंड पॉकेट बुक्स नवी दिल्ली तर्फे प्रकाशित झाली. ऑगस्ट ९८ किं. ३०/- अं.नि. वार्तापत्र किस्त्रीम, आजचा चार्वाकमधील लेखांमधून मांडल्या गेलेल्या विरोधी मतांचे खंडण करणे मला क्रमप्राप्त आहे. तथापि, त्या मासिकांमध्ये माझ्या विचारांना स्थान मिळणार नसल्याने अं.नि. वार्तापत्राच्या संपादकांशी पत्राने व प्रत्यक्ष भेटीतून तसे कळल्याने – या पुस्तकामधून मला त्यांच्या लेखनाचा समाचार घेणे अतिआवश्यक झाले आहे.
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.