

E Book 202 बोध अंधश्रद्धेचा ४ . पान १६५ ते १७६ पर्यंत परि ४- ११ ते १३ अ परिशिष्ट क्र. ४/१२ ओकांचे डॉ. नी. र. वऱ्हाडपांड्यांना आवाहन दिनांक १९-११-९५ डॉ. नी.र. वऱ्हाडपांड्यांचे कुत्सित उत्तर दि. २-२-९६ श्री. नी.र. वहऱ्हाडपांडे, ३८ हिन्दुस्तान कॉलनी, अमरावती रोड. नागपूर ४४००१० यांनी Inland वर पाठवलेली प्रतिक्रिया
नाडी भविष्याच्या केसला ‘प्रायमा फेसी’ वाजवीपणाच नाही त्यामुळे त्याची वैज्ञानिक तपासणी करण्यात वेळ घालविणे एखाद्या इस्पितळातील डोके बिघडलेल्यांच्या बडबडीला वैज्ञानिक कसोट्या लावून तिचा खरेपणा तपासून पाहण्याइतके निरर्थक आहे. “ऋषिजनांनी प्रज्ञाचक्षूनी जे पाहिले ते लिहून ठेवले, त्यामुळे हा प्रकार बुद्धीच्या स्तरावरील भविष्य कथनाच्या कक्षेच्या बाहेर जातो” असे आपण म्हणता. असा तो बाहेर जातो तर वैज्ञानिकदृष्टया नाडी विज्ञान खरे ठरवण्याची आपली मागणी का? “ऋषिजनांनी प्रज्ञाचक्षूने पाहिले ते लिहिले” हे आपणांस कसे कळले? मी जर म्हणालो की, ‘नाडी ग्रंथात जे लिहिले आहे त्या शुद्ध गप्पा आहेत, असे मला प्रज्ञाचक्षूने कळले’ तर माझे म्हणणे खोटे हे आपण कसे सिद्ध करणार?
“भविष्य पाहण्यास कोण येणार याचे ज्ञान त्या थोर ऋषींना होतेच. त्यामुळे तेवढ्याच सर्वांच्या पट्ट्या त्यांनी लिहून ठेवल्या” असे आपले दुसरे विधान आहे. यावर मी जर असे म्हणालो की, भाबड्या लोकांना फसवण्यासाठी भोंदू लोकांनी या पट्ट्या लिहिल्या आहेत” तर माझे म्हणणे खोटे व तुमचे खरे असा आग्रह तुम्ही कशाच्या आधारावर धरणार?
तेव्हा नाडी विज्ञानाच्या नादात आपण आपल्या बहुमूल्य वेळेचा अपव्यय करू नये अशी माझी आपणांस विनती आहे.
आपला
नी. र. वन्हाडपांडे
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.