बोध अंधश्रद्धेचा ४ . पान १८४ ते २०० पर्यंत परि ४- १७ ते २४ ब
या पत्रासोबत श्री. श्रीकांत शहा आपणास भेटत आहेत. ते समितीचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासोबत ज्यांचे भविष्य नाडी केंद्रातील ग्रंथाच्या आधारे बघावयाची इच्छा आहे त्या व्यक्तींच्या अंगठ्याचे ठसे व संतती वगळता आवश्यक ती अन्य सर्व माहिती पाठवीत आहे. आपण ता. २२-२-९५ व २३-३-९५ या पत्रांत जी माहिती आवश्यक असल्याचे कळवलेत ती पाठवली आहे. तसेच अंगठ्याचे ठसेही आपल्या सूचनेप्रमाणे घेऊन पाठवले आहेत. याबरोबरच त्या व्यक्तींच्या कुंडल्याही पाठवत आहे. त्या व्यक्तींच्या पत्रिका स्वतंत्रपणे मांडावयाच्या असल्यास त्यांची जन्मतारीख, वेळ, जागाही कळवली आहे. तपासणी फी प्रत्येकी रु. १२५ प्रमाणे रोख पाठवली आहे.
आपण कृपया या माहितीच्या आधारे त्यांचे पान हुडकून संबंधितांना एकूण मुले किती? एवढ्या एकाच संदर्भातील माहिती श्री. श्रीकांत शहा यांना नाडीग्रंथ केंद्राकडून त्वरीत मिळेल याबद्दल सर्व सहकार्य करावे ही विनंती. आपणाकडून येणारी माहिती खऱ्या वस्तुस्थितीशी ताडून बघितली जाईल. आपण व आपल्या प्रतिनिधीलाही त्या व्यक्तींशी भेटून त्याची सत्यता तपासता येईल. या सत्यशोधनास आपण पूर्ण सहकार्य कराल अशी खात्री वाटते.
आपला विश्वासू
नरेंद्र दाभोळकर
….
मी आपल्या संस्थेचा फी भरून झालेला सभासद नसल्याने दूर राहत असल्याने याबाबत माझी माहिती शून्य आहे. सार्वजनिक हिताच्या संस्थेचा आर्थिक पाया काय आहे हे एक हितचिंतक या नात्याने व आपण मला वेळोवेळी दिलेल्या ५ लाखाच्या आव्हानाच्या संदर्भात तुम्ही भविष्यकाळात माझे देणेकरी होण्याची शक्यता असल्याने मला जाणून घेण्याचा नैतिक अधिकार आहे हे आपण अमान्य करणार नाही. आपल्या ताळेबंदात विविध इतर व्यक्तींना लाखो रुपयांची आव्हाने देऊन Accured Liabilities आपण तयार केल्या आहेत. त्या सर्व फेडायची वेळ आली तर ती तरतूद आपण कशी केली आहेत. (Assets Side) आपण अद्याप जिंकलेल्या केसेस कोणत्या? त्यासंदर्भात व कोर्टकचेरीच्या संदर्भात किती खर्च आला वगैर तपशील ताळेबंदात नमूद असेल. हे ताळेबंद ज्या सभासदांना पाठवले जातात त्यांच्या पत्त्याची लिस्टही कदाचित तयार असेल. ती अशी सर्व माहिती सार्वजनिक व माझ्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्याने पाठवावी. १ वर्ष जुना Audited Balance sheet ताबडतोब व नंतर सध्याच्या वेळचा पाठवायला आपण मागेपुढे पाहणार नाही अशी अपेक्षा.
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.