
E Book 205 बोध अंधश्रद्धेचा ४ . पान २०० ते २२० पर्यंत परि ४- १७ ते २४ ब – Copy अं.नि.स.ची बाजू आपण वाचलीच आहेत. मी पूर्वीपासून त्यांना प्रत्यक्ष अनुभव घ्यायला या असा आग्रह धरला आहे. कारण जी संस्था ५ लाखांचे बक्षीस लेखी-जाहीर आव्हान देते, त्यांनी या नाडी भविष्याबद्दल सातारा/पुणे येथे लेख, परिपत्रके काढून महाराष्ट्रातून ही परीक्षा माझ्या हाती अंगठ्यांचे ठसे देऊन घेणे सर्वस्वी अयोग्य आहे हे आपणही मान्य कराल.
श्री. रिसबुडांची ‘मला एक व्यक्तीबद्दल नाडी पट्टी शोधून प्रत्यंतर हवे ‘अशी मागणी
दिनांक : १६-१२-९५
श्री. मा. श्री. रिसबुडांना, स.न.वि.वि.
आपले दि. ११ डिसें ९५ चे पत्र व आपल्या किर्लोस्कर मासिकातील लेखाची झेरॉक्सही मिळाली. आपण फलज्योतिषाचे अभ्यासक आहात. आपला स्वभाव कुठल्याही गूढ गोष्टीची मुळापासून चिकित्सा करण्याचा आहे. नाडी ग्रंथांच्या बाबत आपण सखोल वाचन केलेले आहेत.

मी नाडी केंद्राकडून भेटीची तारीख कळवावी की लगेच आपण व अं.नि.स. चा प्रतिनिधी रु. १२५० घेऊन येणार इतके सर्व उत्साहाचे पत्रलेखन आपणांकडून झालेले असता या पत्रात मात्र आपण एकदम नाडी ग्रंथांच्या विश्वसनीयतेचे रोकडे प्रत्यंतर मला आणून द्या अशी विनंती करून एका स्त्रीचा अंगठा छाप व पत्रिका पाठवून द्यावीत यामधील विरोधाभास मला अत्यंत गंभीर वाटतो. आपण ज्येष्ठ विचारक व्यक्ती आहात. आपल्या लेखामुळे माझा आपणांबाबत आदर दुणावला आहे. आपणांसारख्या वरिष्ठांनी अं.नि.स. सारख्या प्रतिष्ठित संस्थेवर ‘नाडी भविष्य’ पहायला, अनुभवायला डॉ. दाभोळकर, डॉ. बोरकर यासारख्यांवर नैतिक दडपण आणायला हवे. अं.नि.स.ला. वाटेल तसे ते करतील, माझा त्यांचा संबंध नाही असे आपणच म्हणाल्यावर माझ्यासारख्या दूरस्थाने त्यांचे मन वळवण्यासाठी आणखी कोणाकडे पहायचे? आपणांसारख्या विद्यावंत व सूज्ञ विचारवंत व्यक्तीने पोस्टाने अंगठे छाप पाठवतो या अं. नि. स. च्या मागणीतील विक्षिप्तपणा व फोलपणा लक्षात आणून द्यायला नको का? नाही तर जे आपण लाजत म्हणता की (नाडी भविष्याचा अनुभव न घेताच)… मी कोणत्या तोंडाने म्हणू… की या नाडी ग्रंथांच्या विश्वसनीयतेचे रोकडे प्रत्यंतर आणून द्या. तेच अं.नि.स. उघड व बेधडक विचारते. त्यांच्यात व आपणांत फरक काय?
दि. २६ जानेवारीनंतर आपण व अं.नि.स.चे प्रतिनिधी प्रत्यक्षात याल अशी अपेक्षा करतो.
आपला स्नेहाभिलाषी शशिकांत ओक
मुद्दा क्र. ३- ” भूर्जपत्रावरील मजकूर आहे असे नाडी ज्योतिषी भासवतात. वस्तुतः ते मनातलेच बोलत असतात..” हे आपण अनुभवले काय ? नाही ना? मग आपण असा तर्क करण्यामधून कांहीच सिद्ध होत नाही.
Reviews
Clear filtersThere are no reviews yet.