नाडी ग्रंथ भविष्य आणि श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत नाडी ग्रंथ या विषयावर पंचवीस वर्षात प्रस्तुत लेखकाचे अनेक अंगांनी लेखन आले आहे. वेगवेगळ्या यातून नोंदले गेलेले आहे. नाडी ग्रंथ हे प्राचीन काळच्या महर्षींनी सध्याच्या काळातील व्यक्तींना उद्देशून केलेले एक भविष्यकथन आहे. हे बघ अत्यंत वैयक्तिक किंवा खाजगी असल्यामुळे त्याचा बोलबाला, नोंद ठेवली जात नाही किंवा मुद्दाम टाळली जाते. ते इतके खाजगी असते की बऱ्याचदा पतीने / पत्नीने नाडी भविष्य पाहिले आहे, हे परस्परांना माहीत नसते. मुलांच्या करता आईवडिलांनी त्यांचे भविष्य पाहिलेले आहे हे त्या मुलांना माहिती नसते. कदाचित थोडेसे माहिती असले तरी त्यात काय म्हटले गेलेले होते याचा थोडा देखील पुरावा किंवा माहिती लिहून ठेवलेली नसते. अ. ५मधे … दाढीमिशांचे मुंडण ! जेव्हा शंकर भट्ट तिरुपतीच्या आसपास खेडेगावात असताना एका नाभिक घरातील व्यक्तीला आपला वीस वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा तो हाच असे वाटून त्यांना घरी आणून आळेबळे तू आमचा हरवलेला मुलगा आहेस असे म्हणून त्यांच्यावर विविध तऱ्हेने ते मान्य करण्यासाठी दबाव आणतात. सून म्हणून मानलेल्या मुलीला ते तिचा नवरा आहे असे म्हणून सांगतात. तीही मान्य करते. दाढीमिशांचे मुंडण करून त्यांचे व्यक्तिमत्त्व देखील बदलले जाते. ‘आपण म्हणता तो (तुमचा मुलगा) मी नाही असे बऱ्याचदा सांगून देखील त्यांचे म्हणणे मान्य केले जात नाही आणि नाईलाजाने शंकर भट्टांना तेथे राहणे भाग पडते. त्या घरच्या लोकांनी केलेल्या मांत्रिक-तांत्रिक कारवायांमुळे शारीरिक आणि मानसिक त्रास सोसावा लागतो. त्या मुलीला मी तुझा नवरा नाही असे कळवळून सांगत असले तरी तिला ते मान्य करणे अवघड जाते. ती म्हणते, ‘माझे लग्न झाले त्यावेळेस मी फक्त दोन वर्षांची होते. मला माझा पती कोण हेही माहित नव्हते. परंतु ह्या घरच्यांनी मला तुम्हीच माझे पती आहात असे म्हटले तर ते मला मान्य होईल. या सर्वातून सुटका करणे सर्वस्वी अशक्य अशी परिस्थिती असताना, ज्या श्रीपाद श्रीवल्लभ ह्या व्यक्तीला भेटायची अत्यंतिक इच्छा असूनही भेटणे होणार नाही म्हणून निराश झालेल्या शंकर भट्टांना अचानक नाडी ग्रंथ वाचन मदतीला येते. एक नाडीवाचक तिथे त्या कुटुंबियांना घरी कवड्यांचे दानटाकून त्याच्या जवळच्या ताडपट्टीवर लिहिलेले भविष्य कथन करतो आणि सांगतो की हा व्यक्ती तुमचा मुलगा नाही. याचे नाव शंकर भट्ट असून तो श्रीपाद श्रीवल्लभ व्यक्तीच्या शोधात चाललेला आहे. पुढील काळात त्याच्या हातून श्रीपादवल्लभ चरितामृत पोथीचे लेखन होणार असेल. तुम्ही ज्या मुलाच्या शोधात आहात तो उद्या सकाळी घरी परतेल. या भविष्यकथनाचा प्रत्यय लगेच दुसऱ्या दिवशी त्या कुटुंबियांचा वीस वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला मुलाचा परत घरी येतो. ही श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा आहे असे समजून शंकर भट्ट आपला पुढील प्रवास सुरू ठेवतात.
(E Book 9) भाग ९ पंचांगातील संदर्भ
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 12) भाग १२ अवांतर माहिती
₹50.00 Original price was: ₹50.00.₹20.00Current price is: ₹20.00.
(E Book 10) भाग १० नाडी ग्रंथ भविष्य
Description
Discounted E-books
(E Book 113) हिन्दी रमणीगुरुजी द्वारा दिव्य वाणी कथन
(E Book 184) Naadi Astrology A Hoax?
(E Book 232) The Sacrifice of Purandar’s Hero Murarbaji
(E Book 233) The Intricate Treaty of Purandar Part 2
(2025 E Book 239) Shivaji Maharaj’s first naval expedition at Basrur
(2025 E Book 237) Afzal khan’s Lost Victory
Top E-books
Customer Reviews
Rated 0 out of 5
0 reviews
Rated 5 out of 5
0
Rated 4 out of 5
0
Rated 3 out of 5
0
Rated 2 out of 5
0
Rated 1 out of 5
0
Be the first to review “(E Book 10) भाग १० नाडी ग्रंथ भविष्य” Cancel reply

Reviews
Clear filtersThere are no reviews yet.